MAHARASTRATIL SHETAKARI CHALVAL : KAL ANI AAJ

Authors: प्रा. डॉ. दत्तात्रय सौदागर सावंत,
Publish Date/ Year : नवंबर २०२५ | Format: Paperback | Genre : Agriculture | Other Book Detail

जेव्हा मी 'महाराष्ट्रातील शेतकरी चळवळ : काल आणि आज' या पुस्तकाच्या लेखनाला सुरुवात केली, तेव्हा माझ्या मनात फक्त एकच प्रश्न होता. तो म्हणजे आपण शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे किती गांभीर्याने पाहतो आहोत? शहरातल्या एअरकंडिशन्ड खोलीत बसून धोरण ठरवणाऱ्यांना विदर्भातल्या शेतकऱ्याची रात्रभर जागून कापूस वेचणारी बायको आणि सकाळी आत्महत्या करणारा नवरा याची जाणीव कितपत आहे? आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या ऊसतोड कामगाराच्या मुलीला शिक्षणासाठी ऊसतोडीला जावे लागते, तेव्हा त्या मुलीच्या मनातली अस्वस्थता आपल्याला जाणवते का?
Pages

१८६ pages
Language

मराठी
Publication date

नवंबर २०२५
ISBN-13

९७८-९३-६६७८-९७९-८




Book Also Available On


Share:

Delivery


Enter pincode for exact delivery dates


Buy Now
प्रा. डॉ. दत्तात्रय सौदागर सावंत

प्रा. डॉ. दत्तात्रय सौदागर सावंत

एम. ए., एम. फील., पीएच. डी., सेट (राज्यशास्त्र) लेखक शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथील राज्यशास्त्र अधिविभागामध्ये हंगामी सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्याआधी बाळासाहेब देसाई कॉलेज, पाटण व श्रीराम कुसुमताई सदाशिव वंजारे महाविद्यालय, लांजा येथे दहा वर्षे राज्यशास्त्र विषयाचे प्राध्यापक म्हणून अध्यापन कार्य केले आहे. शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर व यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक यांच्या पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी राज्यशास्त्र, लोकप्रशासन, आंतरराष्ट्रीय राजकारण आणि सामाजिक चळवळी या विषयावर २० घटकांचे लेखन केले आहे. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय जर्नल व UGC care list and referred journal मध्ये २९ संशोधन लेख प्रकाशित झाले आहेत. तसेच ते तथागत या सेवाभावी संस्थेचे उपाध्यक्ष आहेत.